मुंबई - कंगना काय ट्विट करते ते आम्ही पाहत नाही, आम्ही झाले गेले विसरून गेलो आहोत, अशा शब्दात सामनाचे संपादक संजय राऊत यांनी कंगना वादावर आज प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून कंगना विरोधात शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून अभिनेत्री कंगनाने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले असून सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून वादग्रस्त विधाने केली जात आहेत.
कंगना मुंबईत दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने तिच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतरही कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत टीका केली होती. शिवसेनेच्या वतीने याविषयी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही किंवा कोणताही प्रवक्ता बोलणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आज संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.