रत्नागिरी -विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव ( bhaskar jadhav ) हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेले धान्य त्यांना वर्षभर पुरते. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले. तरी भास्करराव जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस ते चालू शकले नव्हते. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.
शिवसेनेचे आक्रमक भास्कर जाधव रमले पेरणीत उद्धव ठाकरे शिवसेना नावाची शेती पुन्हा एकदा फुलवतील - भास्कर जाधव
शिवसेना नावाचे जे शेत आहे, त्याची मालकी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. त्यांनी ती मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे कोणत्या शेतात कुणाला मशागतीत पाठवायचे, कुणाला किती बी बियाणे द्यायचे, कुणाला किती पाणी आणि खत द्यायचे हे सगळे ठरवणारे उद्धव ठाकरेच आहेत. ते याबद्दल योग्य तो निर्णय घेऊन ही शिवसेना नावाची शेती पुन्हा एकदा फुलवतील यात शंका नाही असेही भास्कर जाधव यांनी यावेळी म्हटले आहे.
एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया - समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पायाची घोटशीर तुटली होती आणि त्यानंतर काही दिवस चालताना त्रास होत होता. पण त्यावर त्यांनी मात केली. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना पहावयास मिळाले.
हेही वाचा -Nana Patole On BJP : देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करून बाहेर जायचे, भाजपला सत्तांतराचे परिणाम भोगावे लागतील - नाना पटोले