मुंबई- विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची नाव निश्चित करण्यात आली आहेत.
विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून 'या' दोघांची नावे निश्चित... - शिवसेना बातमी
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे ला निडणूक होत आहे. यासाठी शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत.
shiv-sena-confirms-names-of-both-for-state-legislative-council-election
हेही वाचा-लाॅकडाऊन: दिव्यांग करतोय एका पायाने 400 किमीचा प्रवास...
विधान परिषदेच्या या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड मधील शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या केल्या आहेत. दरम्यान 11 मे च्या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे.