मुंबई - माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन हा देशाला धक्का आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) एकसंध ठेवणार खांब कोसळला आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला.
एनडीएला एकसंध ठेवणारा खांब कोसळला; उद्धव ठाकरेंची जेटलींना आदरांजली
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन हा देशाला धक्का आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे. अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेटलींच्या निधनावर शोक व्यक्त केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यानंतर राजकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनावर उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. जेटलींचे व्यक्तिमत्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व जपले. संकटमोचक म्हणून जेटलींनी मोदी सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजप नाते टिकावे असे मानणाऱ्यांपैकी जेटली एक होते असेही ठाकरे म्हणाले. जेटलींच्या जाण्याने देशाचे नुकसान झालेच आहे, त्याचबरोबर ठाकरे परिवार आणि शिवसेनेची हानी झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.