मुंबई - भायखळा मतदारसंघामध्ये अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच मतदारसंघातील तरुण नशेच्या आहारी गेला आहे. मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित छत्र आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नशेतून मुक्त करण्याचे काम करणार असल्याचे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी म्हटले आहे.
मुंबईमधील भायखळा मतदार संघामधून एमआयएमचे आमदार वारिस पठाण, काँग्रेसचे उमेदवार मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेकडून अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात म्हाडाच्या इमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यापैकी काही इमारती पडण्याच्या अवस्थेत आहेत. मी जर आमदार म्हणून निवडून आले तर या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित छत्र देण्याला प्राधान्य देईल, असे त्यांनी म्हटले आहे.