महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Jayanti 2023 : ट्रेन मॅनेजर व मोटरमन बांधवांनी उत्साहात साजरा केला शिवजयंती उत्सव - शिवजयंती

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ट्रेन मॅनेजर, मोटरमन बांधवांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली. गेल्या 35 वर्षापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात न चुकता साजरी केली जाते. या महोत्सवा विषयी बोलताना सीनियर ट्रेन मॅनेजर श्रीकृष्ण माने म्हणाले की, गेली ३५ वर्षे हा कार्यक्रम सुरू आहे. १९८८ सालापासून पासून मंडळाचे संस्थापक बी. डी. जाधव यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.

Shiv Jayanti Utsav
शिवजयंती उत्सव

By

Published : Feb 19, 2023, 7:16 PM IST

ट्रेन मॅनेजर व मोटरमन बांधवांनी उत्साहात साजरा केला शिवजयंती उत्सव

मुंबई :महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस. ही शिवजयंती आज मोठ्या प्रमाणामध्ये देशभर साजरी होत असताना महाराष्ट्रात विशेष करून मुंबईमध्येसुद्धा सर्वत्र ही शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे. यामध्ये मुंबईत शिवरायांच्या नावाने असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुद्धा मागील ३५ वर्षापासून ही शिवजयंती न चुकता साजरी केली जात आहे. मध्य रेल्वेचे कर्मचारी यामध्ये ट्रेन मॅनेजर, मोटरमन, लोको पायलट यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून याही वर्षी त्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

३५ वर्षापासून शिवजयंती उत्सव :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे ट्रेन मॅनेजर व मोटारमन बांधवांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवा विषयी बोलताना सीनियर ट्रेन मॅनेजर श्रीकृष्ण माने म्हणाले की, गेली ३५ वर्षे हा कार्यक्रम सुरू आहे. १९८८ सालापासून पासून मंडळाचे संस्थापक बी. डी. जाधव यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.

शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव : आज सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांची प्रचंड आकलन शक्ती, स्वराज्य निर्माण करण्यात त्यांचे योगदान, पाचशे वर्षात या हिंदुस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात राज्य विस्तार करणारे, मोघलांचे आक्रमण थोपवनारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम अतिउत्साहात पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात, लेझिम शाहीर यांच्याकडून साजरा होत आहे. आमच्या इथे आता सध्या मॅनेजर आणि मोटरमन तसेच लोको पायलट आणि मध्य रेल्वेचे कमीत कमी हजारो लोकांच्या उपस्थितीत उत्कृष्ठ नियोजन आणि शांततेत कार्यक्रम संपन्न झाला आहे.

विविध कार्यक्रम :शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील परिसर संपूर्णपणे भगवामय झाला होता. रविवार सुट्टीचा दिवस असला तरी येथे येणारा प्रत्येक प्रवासी आवर्जून या शिवजयंतीच्या या उत्साहात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. मध्य रेल्वेचे कर्मचारी पारंपरिक पोशाखात नटून त्यांनी शिवरायांच्या प्राचीन विविध विविध घडामोडी नाट्यमय रूपाने दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर महिलांनी लेझीम नृत्य ही सादर केले.

हेही वाचा -Sanjay Raut Claim : निकाल विकत घेण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटी खर्च; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details