महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोठी बातमी! शिंदे सरकारने मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली! - मिलिंद नार्वेकर

महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने (Shinde government) महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. (Shinde government removed security). सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे.

शिंदे सरकारने मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली
शिंदे सरकारने मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

By

Published : Oct 28, 2022, 9:16 PM IST

मुंबई: राज्याच्या राजकरणात एक मोडी घडामोड घडली आहे. महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने (Shinde government) महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. (Shinde government removed security). सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे.सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे.सरकारने पवार आणि ठाकरे कुटुंब वगळता मविआच्या इतर बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र शिंदे सरकार आघाडीच्या दोन नेत्यांवर मेहेरबान आहे. सरकारने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना आधी एक्स प्लस सुरक्षा होती. मात्र आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आणि एक्सकॉर्ट देण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे.

या नेत्यांच्या सुरक्षेत कपात: सरकारने महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, नितीन राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता शिंदे सरकारने वरुण सरदेसाई यांची देखील सुरक्षा काढली आहे.

जेलमधील या तीन नेत्यांची सुरक्षा हटवली: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत, १०० कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणात त्याच कारागृहात असणारे राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मनी लाँड्रींगप्रकरणी आर्थर तुरुगांत असणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या तिघांची देखील सुरक्षा हटवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details