मुंबई - दहीहंडी आणि गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटवल्यानंतर, आता २६ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri festival) रात्री उशिरापर्यंत गरबा व दांडीयाला परवानगी देण्याबाबत (playing dandiya till late night) शिंदे सरकारने अजूनही निर्णय झालेला (Shinde government not serious) नाही. त्यामुळे गरबाप्रेमी निराश झाले आहेत. त्याचबरोबर फक्त उत्सवाला परवानगी देणे व निर्बंध हटवणे हेच सरकारचं काम आहे का? अशी टीकाही विरोधकांकडून होत असल्याने, या निर्णयाबाबत विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.Navratri 2022
हिंदू सणांवरील निर्बंध हटवले :राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारला आता अडीच महिन्याचा कालावधी झाला असून; यादरम्यान सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू सणांवरील निर्बंध पूर्णपणे हटवण्याचा निर्णय या सरकारने सुरुवातीलाच घेतला व त्या अनुषंगाने दहीहंडी व गणेशोत्सव या सणांच्या दरम्यान सर्वच निर्बंध हटवल्याने, जनतेनेही मोठ्या प्रमाणामध्ये हे उत्सव साजरे केले. 'शिंदे फडणवीस सरकार आले, जनतेचे विघ्न दूर झाले.' अशा पद्धतीचे होर्डिंग सुद्धा मुंबईसह राज्यभर गणेश उत्सवा दरम्यान बघायला भेटले. परंतु २६ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरोत्सवानिमित्त रात्री बारापर्यंत गरबा व दांडियाला परवानगी द्यावी, अशी मागणी होत असताना अजूनही शिंदे सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही.
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची मागणी :शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजेपर्यंत गरबा व दांडियाला परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. विशेष करून महाराष्ट्र शेजारील गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये नवरात्री मध्ये नऊच्या नऊ दिवस रात्री बारापर्यंत हे उत्सव साजरे केले जातात. त्याच प्रकारे महाराष्ट्रात व मुंबईत सुद्धा परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या पत्रामध्ये करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने दहीहंडी व गणपती उत्सवाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले, तसेच यंदाही नवरात्रीमध्ये हटवण्यात येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु याबाबत विशेष करून गृह खात्याकडून उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे.
जनहिताचं सरकार का? :मागच्या अडीच महिन्याच्या कालावधीत या सरकारने ७०० निर्णय घेतल्याची कबुली स्वतः एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी जरी दिली असली तरी, सुद्धा सध्या वादाचा विषय ठरलेला वेदांता फॉस्कॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गुजरात मध्ये गेल्याने, सरकारने नाचक्की ओढवून घेतलेली आहे. याच मुद्द्यावर राजकारण तापलेले असताना सरकार फक्त दहीहंडी, गणेशोत्सव व नवरात्री यामध्येच जनतेला मुभा देऊन त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही होत आहे. हे सरकार जनसामान्यांच आहे, असा उल्लेख वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या प्रत्येक सभेत करत असताना, त्यांच्या या विधानाचा समाचार विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घेतला असून नेहमी, जनसामान्यांचं सरकार असा हे उल्लेख करतात. आमचं सरकार जनसामान्यांचे नव्हतं का? आम्ही का आकाशातून पडलो होतो का? असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता फक्त निर्बंध हटवणे किंवा उत्सवाला मुभा देणे हे सरकारचे जनहिताचे काम नसून, जनहिताचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणणे व रोजगार निर्मिती करणे हा मुख्य उद्देश असला पाहिजे अशी टीका विरोधकांकडून होत असल्याने, आता नवरात्री उत्सवाचा निर्णय लांबणीवर पडला गेला असल्याचं जाणकारांचे मत आहे. Navratri 2022