महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cabinet Expansion : शिंदे- फडणवीसांपुढे मंत्रिमंडळ विस्तारात जातीय, प्रादेशिक समतोल राखण्याचे आव्हान

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचे, शिंदे - फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अनेकांनी लॉबिंग लावली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्याच्या आव्हान मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसन पुढे असणार आहे.

Shinde- Fadnavis
शिंदे- फडणवीस

By

Published : May 20, 2023, 9:49 PM IST

मुंबई :पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईतून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला होता. सत्ता संघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगळता 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थिर झाले आहे. सरकारला कोणताही धोका नसल्याने उर्वरित रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा, जे. पी नड्डा यांच्याशी सल्लामसलत करून रातोरात नागपूरला परतले. मंत्रिमंडळ विस्तार आता होईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.


जातीय, प्रादेशिक समतोल राखणार: राज्य सरकारमध्ये येत्या आठवड्यात नव्या मंत्र्यांची वर्णी लागेल, असा दावा भाजप, शिंदे गटाचे आमदार, प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांनी केला आहे. सरकारमध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्री अशा एकूण 42 मंत्र्यांचा समावेश असतो. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ 38 मंत्र्यांची नेमणूक करण्यात येत असून, 4 खात्यांचा अतिरिक्त कारभार इतर मंत्र्यांकडे सोपवला जातो. शिंदे सरकारमध्ये सध्या वीस मंत्री कार्यरत आहेत. उर्वरित 18 मंत्र्यांचा लवकरच मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल राखण्याचे आव्हान शिंदे फडणवीस सरकार समोर असणार आहे.



असा होईल विस्तार: मराठा, ओबीसी, धनगर आणि मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. तसेच, संघटनात्मक गणित पाहून मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. विशेषतः पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई आदी प्रत्येक जिल्ह्याला संधी देऊन प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. 12 राज्यमंत्री आणि 8 कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे समजते. अनेक नव्या चेहऱ्यांना यात संधी मिळण्याची शक्यता आहे.




मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार:माजी गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे कॅबिनेटची जबाबदारी राहील. आशिष शेलार, योगेश सागर, संजय कुटे, प्रवीण दरेकर, गणेश नाईक, गोपीचंद पडळकर, विनय कोरे, जयकुमार गोरे, मनीषा चौधरी, मंदा म्हात्रे, देवयानी फरांदे, तर शिंदे गटाकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, बालाजी किनीकर, सदा सरवणकर, अनिल बाबर, चिमणराव पाटील, यामिनी जाधव, प्रकाश आबिटकर, दिलीप मामा लांडे आदी इच्छुक आहेत.

हेही वाचा -

  1. Bhagat Singh Koshyari Met CM मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमाजी राज्यपाल कोश्यारी यांची भेट सत्तासंघर्षावर चर्चा
  2. MVA on BMC Election बीएमसी निवडणुकीबाबत महाविकास आघाडीचा मोठा दावा थेटच सांगितले
  3. Aaditya Thackeray On CM आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान म्हणाले राजीनामा

ABOUT THE AUTHOR

...view details