मुंबई :महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. (Maharashtra Karnataka border dispute). त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने करत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात देखील तणाव निर्माण झाला होता. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सीमा भागात मराठी बांधवांच्या वाहनांवर हल्ले केले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमा भागात 48 तासाच्या आत हे सर्व हल्ले थांबले नाही तर मी स्वतः सीमा भागात जाऊन मराठी बांधवांना धीर देईल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. (Sharad Pawar on border dispute). मात्र सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागामध्ये शांतता आहे. तेथील लोकांशी सातत्याने शरद पवार संपर्कात आहेत आणि तेथीलच लोकांनी शरद पवार यांनी आता तिथे येऊ नये असे म्हटल्यामुळे शरद पवार सीमा भागात आता जाणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.
Border Dispute : सीमा भागात आता शांतता, त्यामुळे शरद पवार तेथे जाणार नाहीत - जितेंद्र आव्हाड - शरद पवार सीमा भागात आता जाणार नाहीत
पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad), "कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. मात्र कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कानडी जनतेचा जनाधार मिळवण्यासाठी बोम्मई अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत." (Maharashtra Karnataka border dispute). (Basavaraj Bommai on border dispute).
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड : पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, "कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. मात्र कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कानडी जनतेचा जनाधार मिळवण्यासाठी बोम्मई अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री संपूर्ण देशातलं वातावरण खराब करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कानडी आणि मराठी लोकं एकत्र राहत आहेत. महाराष्ट्रातही हजारो कर्नाटकी बांधव आहेत. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे शांतता भंग होऊ शकते", असे आव्हाड म्हणाले. तसेच राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारने या मुद्द्यावर अद्यापही भूमिका घेतली नसल्याचा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.