मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा तीन दिवसीचा निवडणूक प्रचार दौरा उद्यापासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर असा निवडणूक प्रचाराचा झंझावाती दौरा केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिनांक ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत शरद पवार झंझावाती दौरा करणार आहेत.
शरद पवारांचा उद्यापासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात निवडणूक प्रचार दौरा - NCP
शरद पवार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात दिनांक ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत निवडणूक प्रचार दौरा करणार आहेत.
शरद पवार
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये दिनांक ८ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता, पारोळा सायंकाळी ५ वाजता, दिनांक ९ ऑक्टोबरला विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी ११.३० वाजता, वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा दुपारी ४ वाजता, दिनांक १० ऑक्टोबरला हिंगणघाट येथे सकाळी १०.३० वाजता, बुटीबोरी-हिंगणा ३ वाजता, काटोल ५ वाजता आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.