मुंबई - कोरोनाच्या संकटात सापडलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी जी यंत्रणा उभी केली जात आहे, ती यंत्रणा नेमकी कशी आहे, याची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमएमआरडीए मैदानावर आले होते. त्यांनी मुंबईत एमएमआरडीए मैदानावर उभारण्यात आलेल्या अलगीकरण कक्षातील सुविधा कशा प्रकारच्या आहेत याची माहिती घेण्यासाठी त्या कक्षाला भेट दिली.
शरद पवारांनी केली एमएमआरडीए मैदानातील अलगीकरणाची पाहणी - world health emergency
विविध राजकीय पक्षांचे अनेक दिग्गज नेते भीतीपोटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पाऊल ठेवत नाहीत. मात्र, मुंबईकर संकटात सापडला असल्याने शरद पवार यांनी आपल्या वयाचा आणि कोरोनाच्या भीतीचा विचार न करता बांद्र्यातील अलगीकरणाच्या कक्षाला भेट दिली. मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. याची पवार यांनी पाहणी केली.
शरद पवारांनी केली एमएमआरडीए मैदानातील अलगीकरणाची पाहणी
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी होती. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह पाहणी करतानाच तिथल्या क्वारंटाईन सुविधेचा व परिस्थितीचा आढावाही पवार यांनी घेतला.