मुंबई- कोकण किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली. यात जिल्ह्यांना मोठे नुकसान झाले. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व मदतकार्याचा आढावा घेतला.
शरद पवारांनी घेतला 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा
काल (गुरुवारी) 'निसर्ग' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला आणि त्यानंतर पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून कोट्यावधी रुपयांच्या शेती उत्पादनाचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे आदी उपस्थित होते. पक्षाच्या नेत्यांशी शरद पवार यांनी विस्ताराने चर्चा केली व एकंदरीत संपूर्ण माहिती घेतली.
दरम्यान, काल (गुरुवारी) 'निसर्ग' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला आणि त्यानंतर पुणे, नाशिक आदी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून कोट्यावधी रुपयांच्या शेती उत्पादनाचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता आणि त्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन या वादळाच्या संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला प्रशासनासोबत उभे राहण्याचे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.