मुंबई- लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 तारखेला संपणार आहे. त्यामुळे जर लॉकडाऊन उठवल्यास कोणाही एकत्र येऊन गर्दी करण्याची गरज नाही. परिस्थिती गंभीर आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे लागेल. 3 तारखेनंतर शासनाची काय भूमिका असेल हे लवकरच स्पष्ट होईल. कोरोना हे संकट गंभीर आहे पण याआधीही अनेक संकटांना आपण सामोरे गेले आहोत, असे खासदार शरद पवार म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, मे महिन्यात बँकांना नऊ दिवस सुटी असल्याने बँका बंद असतील. त्यामुळे घाईने तेथे गर्दी करण्याची गरज नाही. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशास व यंत्रणेवर हल्ले केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. त्यातून वेदना होतात. या यंत्रणांना आपण सहकार्य केलेच पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.