महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्याची ही वेळ नव्हती, तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही' - बीएमसी बातमी

कंगना रणौतच्या वक्तव्याला गांभीर्याने लक्ष देऊ नये. शहाण्या लोकांनी याबाबत फार बोलू नये. मुंबई व महाराष्ट्रातील लोकांना पोलिसांचे कर्तृत्व माहीत आहे. त्यामुळे कोणी पाकिस्तानशी तुलना करो किंवा आणखी कुणाची याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये, असे खासदार शरद पवार म्हणाले.

Sharad pawar
शरद पवार

By

Published : Sep 9, 2020, 5:02 PM IST

Updated : Sep 9, 2020, 6:58 PM IST

मुंबई -मुंबईत कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवार यांनीही टीका केली. आता ही कारवाई करण्याचीही वेळ नव्हती यामुळे लोकांच्या मनात एक शंका निर्माण होईल, असे विधान करून पवारांनी महापालिकेकडून करण्यात आलेल्या आलेल्या कारवाईवर टीका केली.

बोलताना शरद पवार

पवार म्हणाले की, सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो. महापालिकेची काही नियमावली आहे, अधिकार्‍यांना योग्य वाटले असेल त्यामुळे त्यांनी काही केले असेल असेही पवार म्हणाले. तसेच बांधकामावर कारवाईबाबत फारशी माहिती नाही. पण, मुंबईत बेकायदेशीर बांधकामे नवी गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.

त्यांना आलेल्या धमकीच्या फोन संदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, मला किती धमकीचे फोन आले त्याचे रेकॉर्ड गृहमंत्र्यांनी मला दिले आहेत, फोन कुठून आलेत त्याची माहितीही दिली. मला सात फोन आले आहेत, चांगली गोष्ट आहे. या आधीही आले होते त्यामुळे फार काही आम्ही नोंद घेत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर पवार म्हणाले की, सगळ्या यंत्रणा एका प्रकरणामागे लागल्या आहेत त्यांना सूचवल असेल. कदाचित याच्यात अधिकचे लक्ष देण्याचा आग्रह कोणीतरी केंद्रात गृह खात्याकडे केला असेल. त्यांना पटले असेल म्हणून त्यांनी अशी भूमिका घेतलेली दिसते, अशी टीका पवारांनी केली.

अभिनेत्री कंगना यांच्याकडून वेळोवेळी करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करून सांगितले की, आपण अधिक महत्त्व देतोय अशा वक्तव्य करणाऱ्यांना अशी वक्तव्य लोक गांभीर्याने घेत नाहीत. मुंबई, महाराष्ट्रातील लोकांना पोलिसांचा अनुभव अनेक वर्षांचा आहे, त्यांचे कर्तृत्व त्यांना माहित आहे. त्यामुळे कुणी पाकिस्तानशी तुलना केली किंवा आणखी कुणाशी केली तरी त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊ नये. याला अधिक प्रसिद्ध देऊन या गोष्टी मोठ्या केल्या आहेत. शहाण्या लोकांनी या गोष्टींबद्दल फार बोलू नये, असा सल्लाच पवारांनी यावेळी दिला.

हेही वाचा -जलयुक्त शिवार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - सचिन सावंत

Last Updated : Sep 9, 2020, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details