महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil Taunt Ajit Pawar: आमची 'नॅशनॅलिस्ट' त्यांची 'नोशनल' पार्टी - जयंत पाटील - शरद पवार यांची नॅशनॅलिस्ट पार्टी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून (Sharad Pawar Nationalist Party) बाहेर पडलेल्या लोकांनी स्थापन केलेली पार्टी ही नोशनल पार्टी (Ajit Pawar Notional Party) आहे. आमची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्यांनी कितीही कारवाया केल्या तरी त्याला काही अर्थ नाही; (Jayant Patil Taunt Ajit Pawar) कारण आपण शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि यापुढे शरद पवारांचा झंजावात आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा पेटून उठेल असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.

Jayant Patil Taunt Ajit Pawar
जयंत पाटील

By

Published : Jul 4, 2023, 5:13 PM IST

Updated : Jul 4, 2023, 10:31 PM IST

जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवारांविषयी प्रतिक्रिया

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून बंडखोरी (Sharad Pawar Nationalist Party) करत सत्ताधारी पक्षात सहभागी झालेल्या नऊ लोकांवर आम्ही कारवाई करत आहोतच; (Ajit Pawar Notional Party) मात्र उरलेल्या आमदारांसाठी आमच्या पक्षाची बैठक उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात आमदार उपस्थित राहतील. (Jayant Patil Taunt Ajit Pawar) त्यावेळी आपल्या लक्षात येईल नक्की काय सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.


त्यांची नोशनल पार्टी :शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार मला या पदावरून दूर करत नाहीत, तोपर्यंत मला दुसरा कुणीही या पदावरून हटवू शकत नाही. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या लोकांनी जी पार्टी स्थापन केली आहे ती नॅशनॅलिस्ट नाही नोशनल पार्टी आहे. त्यांनी कारवाई करून काहीही फरक पडणार नाही. तसेच आमचा पक्ष हा अगदी व्यवस्थित सुरू असून आम्हाला कायद्याची मदत घ्यायची गरज नाही असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.


शरद पवार करणार महाराष्ट्रभर दौरा :पक्षाच्या आमदारांची आणि नेत्यांची उद्या बुधवारी एक वाजता बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत पुढील दोन दिवसात कार्यकारी समितीची बैठक घेतील. कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर शरद पवार हे स्वतः महाराष्ट्रभर दौरा करणार असून पुन्हा एकदा पक्षाची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा आमचा मानस आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यातील जनता आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहेत. त्यामुळे शरद पवार हे नाशिकमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्येही दौरा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.


नवाब मलिक आमचा सोबतच :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत आहेत का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, भाजपसोबत नवाब मलिक कधी जातील असे निश्चितच वाटत नाही. ते आमच्या पक्षासोबतच आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...
  2. Maharashtra Political Crisis : पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..
  3. Ajit Pawar New Office : अजित पवार गटाच्या मुंबईतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन; चावी गहाळ झाल्याने उडाला होता गोंधळ
Last Updated : Jul 4, 2023, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details