मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी पवारांनी फडणवीसांसोबत राज्यात वाढलेल्या दुष्काळाच्या दाहकतेसंदर्भात उपाय योजना आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाबाबत चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर लगेचच शरद पवार दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले होते. पवारांचा दौरा पूर्ण होण्या आधीच राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन झाले. त्यामुळे पवार यांनी पुढचा दौरा केला नाही. मात्र दुष्काळी उपाययोजनाबाबत मुख्यमंत्रांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले होते. त्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी आयोगाकडे केली होती.
या भेटीत शरद पवारांनी फळबाग,छावण्या,दुष्काळी भागातील नागरिकांचा रोजगार ,योग्य पाणी नियोजन, अन्यधान्य नियोजन ,जायकवाडी धरणातील पाणी साठा या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
या चर्चेदरम्यान पवारांनी मांडलेले मुद्दे
१. छावणी चारा अनुदान केवळ ९० रुपये दिले जाते ते १९० करावे,
२. केवळ ऊसाचे वाडे न देता इतर हिरवा चारा ही द्यावा