महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar On Maratha Reservation : केंद्र, राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीनं घ्यावा - शरद पवार - Maratha reservation

Sharad Pawar On Maratha Reservation : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सध्या चढाओढ सुरू आहे. त्यातच भाजपाचा एक बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं आहे. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारला विनंती केलीये.

Sharad Pawar On Maratha Reservation
Sharad Pawar On Maratha Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 8:48 PM IST

शरद पवार यांचं भाषण

मुंबई Sharad Pawar On Maratha Reservation : लातूर जिल्ह्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते विनायकराव पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. यापूर्वी शिंदे गटाचे शहापूरचे माजी आमदार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळं शिंदे, भाजपाला शरद पवार गटाकडून धक्का मानला जात आहे.

आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लावा :मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केंद्र, राज्य सरकारनं त्वरित तोडगा काढावा. त्यासोबतच कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

अनेकांना दुरुस्त करायचे : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मी कधीही गोष्टीची चिंता करत नसतो. 1880 साली निवडणुका झाल्या आणि 59 आमदार निवडून आले. त्यानंतर 'मी' काही कामासाठी परदेश दौऱ्यावर गेलो होतो. परत आलो, तेव्हा 59 मधील 54 आमदार मला सोडून गेले होते. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि जे सोडून गेले, त्यातले फक्त दोनच लोक नंतर निवडून आले.

अजित पवार गटाला टोला : लोकशाहीत जेव्हा मतदानाची वेळ येते, तेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून लोक निर्णय घेतात, असा टोला शरद पवारांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावलाय. त्यावेळी झालेल्या निर्णयाची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही, असं शरद पवार म्हणाले.

राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. या अनुषंगानं रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. याकडं सरकारनं लक्ष द्यावं, तसंच याबाबत राज्यपालांनीं केंद्र सरकार, राज्य सरकारसोबत संपर्क साधत तोडगा काढावा, अशी विनंती केली आहे. याबाबत सोमवारी महाविका आघाडीचं शिष्टमंडळ पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहे.

हेही वाचा -

  1. MP Hemant Patil Resign : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा राजीनामा; दिल्लीत करणार उपोषण
  2. Devendra Fadnavis On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची काळजी घ्या, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन
  3. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details