महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही संविधान बदलू देणार नाही - शरद पवार - नोटबंदी

जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही करू देणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी मेळाव्यात बोलताना शरद पवार

By

Published : Mar 16, 2019, 11:33 PM IST

मुंबई - आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते संविधानावर आघात करत आहेत. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही करू देणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रसेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपवर शरद पवार यांनी टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, काळा पैसा परत आणणार, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यासाठी ते स्वित्झरलँडला गेले. तेव्हा एवढे पैसे आणण्यासाठी विमान पाठवावे असे वाटले. परंतु ते हात हलवत आले. जर सर्व रक्कम परत आली तर काळा पैसा कुठे गेला ?

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात येईल, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. तरीही सरकारने ८ नोव्हेंबरला नोटबंदी केली. तेव्हा मोदींनी काय मास्टरस्ट्रोक मारले असे वाटले. परंतु, या नोटबंदीमुळे अनेक वाईट परिणाम झाले. बँकेच्या रांगेत १०० पेक्षा लोक मारले गेले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतीवर परिणाम झाला, शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळाली नाही.

पुलवामामध्ये ४० जवान हुतात्मा झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वपक्षीयांची बैठक झाली. त्या बैठकीत आम्ही टीका करणार नाही. तुम्ही लष्कराला पूर्ण अधिकार द्या, असे आम्ही सांगितले होते. या बैठकीला सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु भाजपचा एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यावेळी पंतप्रधान कुठे गेले यासंदर्भात चौकशी केली असता ते धुळ्यात राजकीय भाषण देत असल्याचे समजले. आम्ही टीका करणार नाही असे म्हणालो होतो. परंतु त्यांनी या घटनेचा राजकीय फायदा घेतला, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

ते पुढे म्हणाले, सध्या सत्तेचा गैरवापर होत आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ८ ते १० तास बसवून ठेवण्यात येत आहे. दबावाचे राजकारण निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे, की सरकार बदलत असते. त्यामुळे तसे केले तर तुमची चौकशी होईल आणि त्या यातना सहन कराव्या लागतील.

शाळेत मुले बनवतात तशी कागदाची विमानसुद्धा या रिलायन्सने कधी तयार केली नाहीत.राफेलचे कागदपत्र चोरीला गेले. मी संरक्षणमंत्री होतो. त्यामुळे संरक्षण खात्यात कशी कागदपत्रे ठेवतात हे मला माहित आहे. यांचे कागदपत्र चोरीला जातात. नंतर देशभरातून टीका झाल्यावर फाईल चोरीला नाही तर कोणीतरी त्याचे फोटोकॉपी काढली असल्याचे भाजपने सांगितल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details