महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्तेचा उन्माद जनतेला अमान्य, नव्या पिढीच्या हाती नेतृत्व देणार - शरद पवार - महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिजल्ट 2019

सत्तेचा उन्माद जनतेला पसंत पडलेला नाही. सत्ता येते, जाते..पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधकांनी टोला लगावला. जनतेने आम्हाला जो कौल दिला त्याचा मी विनम्र स्वीकार करत असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार

By

Published : Oct 24, 2019, 5:34 PM IST

मुंबई - सत्तेचा उन्माद जनतेला पसंत पडलेला नाही. सत्ता येते, जाते..पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोधकांनी टोला लगावला. जनतेने आम्हाला जो कौल दिला त्याचा मी विनम्र स्वीकार करत असल्याचे पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच बऱ्यापैकी निकाल लागलेले आहेत. यामध्ये महायुती जवळपास १६० जागांच्या आसपास गेली आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ही १०० जागांच्या जवळपास गेली आहे. आणखी काही ठिकाणची मतमोजणी सुरु आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास ५५ जागी आघाडीवर आहे. या जनतेने दिलेल्या मतांचा मी आदर करत असल्याचे पवार म्हणाले.

सातारच्या जनतेचे आभार

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. जनतेने पाटील यांना दिलेल्या साथीबद्दल सातारच्या जनतेचे त्यांनी आभार मानले. तसेच मी स्वत: साताऱ्यात जाऊन साताऱ्याच्या जनतेचे आभार मानणार असल्याचे पवार म्हणाले.

नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देऊ

जनमत पाहता अधिक जोमाने काम करून, नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देण्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. दिवाळी झाल्यावर यासंबंधी वाटचाल करण्यात येईल.

प्रचाराची सीमा विरोधकांनी ओलांडली

निवडणुकीत किती टोकाची मतं मांडायची याला काही मर्यादा असते. पण यावेळी प्रचाराची सीमा विरोधकांकडून ओलांडली गेली. जे पक्ष सोडून गेले आणि निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून उभे राहिले, त्यांच्या बाजूने जनतेने कौल दिलेला नाही, हे स्पष्ट झाल्याचे पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details