मुंबई - भाजपप्रणित रालोआला बहुमत मिळाले नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्ष मायावती आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित शरद पवारांनी केले होते. मात्र, त्यांनी सोमवारी मी असे म्हटले नव्हते. माध्यमांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला, असे सांगितले.
माध्यमांकडून माझ्या शब्दाचा विपर्यास, पंतप्रधानपदाच्या प्रश्नाबाबत पवारांचे वक्तव्य
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित केले होते. मात्र, त्यांनी सोमवारी मी असे म्हटले नव्हते. माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, असे वक्तव्य केले.
भावी पंतप्रधानपदाचा प्रश्न विचारताना माध्यमांनी मला विचारले राहुल गांधी शिवाय इतर कोण पर्याय आहे तर त्यावर मी म्हटले की, मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावे आहेत. ज्यांनी छापले किंवा दाखवले त्यांची अपरिपक्वता आहे, असे सांगत त्यांनी देशात स्थिर सरकार येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.
मुंबईतील सहकारी विद्यामंदिर ताडदेव मतदान केंद्रावर शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सोबत सोमवारी मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते, तरीही मुंबई मागे राहणार नाही. मला सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या वाटतात. मावळ काय बारामती काय मुंबई काय, लोक निर्णायक निर्णय घेतील असे ते म्हणाले.