मुंबई -ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेत आहेत. समाजातील पिछाडलेल्या वर्गाकडे केंद्र सरकारचे लक्ष नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. सरकारने पिछाडलेल्या वर्गासाठी काम करणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. तसेच भारतातल्या नातेवाईकांना भेटण्याची पाकिस्तानच्या मुस्लिमांची इच्छा आहे. मात्र, ते मुस्लीम असल्याने त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले.
क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तेव्हा असे अनेक लोक मला भेटले की, त्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांची मनापासून इच्छा आहे की, त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटीगाठी व्हाव्यात. पण केवळ ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांना भारतात येण्यास परवानगी नसल्याचे पवार म्हणाले.