मुंबई :शिवसेना-भाजप युती सरकारचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये सर्व क्षेत्रांसह सिंचन क्षेत्रालाही न्याय देणयात आला आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने सौरपंपनां बळकटी देण्यासाठी विविध घोषणा यामध्ये केल्या आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात वीजसंकट असते. त्या पार्श्वभूमीवर सौरपंपाना वीज जोडणी प्रकल्पासाठी योजना केली आहे. तसेच, इतर योजनांचीही त्यांना यामध्ये घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडणी :
- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षात 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकऱ्यांना लाभ
- पंतप्रधान कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86, 073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 लाख
- पंतप्रधान 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत
नदीजोड प्रकल्प :
- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
- नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील पाणी वापरणार
- मुंबई, गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
- वैनगंगा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ
तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
- पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुर्भरण प्रकल्प
- केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करणार
- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
- या प्रकल्पासाठी 11, 626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता