मुंबई :महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजलेला बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील तेलगीचा ( Abdul Karim Ladsaab Telgi ) सहकारी शब्बीर शेखला मुंबई सत्र न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणात पाच वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली ( Shabbir Shaikh sentenced five year imprisonment ) आहे. न्यायालयाने बनावट स्टॅम्प पेपरच्या छपाई आणि वितरित करण्याच्या आरोपात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्याने आरोपीला शिक्षा सुनावल्यात आली ( Fake Stamp Paper Scam Case ) आहे. हा निर्णय मुंबई सत्र न्यायालयातील विशेष अतिरिक्त न्यायाधीश सुनील यू हेक यांनी दिला आहे.
स्टॅम्प पेपर घोटाळा : बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्या प्रकरणात 2009 मध्ये आरोपी शब्बीर शेख आणि तेलगीविरुद्ध वरळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी शब्बीर शेख दोषी आढळल्याने न्यायालयाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 16000 रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणावर दोन्हीही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखीव ठेवण्यात आला होता. या संदर्भातील सविस्तर सहा पानाची ऑर्डर मुंबई सत्र न्यायालयातील वेबसाईटवर उपलब्ध करून घेण्यात आली आहे. फिर्यादी खटल्यानुसार दोघांवर गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शब्बीर शेख ने बनावट महसूल शिक्के तयार केले. शेख जो तेलगीचा जवळचा सहकारी होते. आरोपी शब्बीर शेख 2002 ऑक्टोंबर पासून तुरुंगात होता तर या घोटाळ्यातील मास्टरमाईंड तेलगीचा ऑक्टोबर 2017 मध्ये तुरुंगात मृत्यू झाला होता. सध्याच्या प्रकरणात पोलिसांनी 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते परंतु खटला सुनावणीसाठी प्रलंबित राहिला होती.