मुंबई - शेअर बाजारातील तेजीमुळे आज (24 सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्स 375 अंकांनी वाढून 60,260 वर स्थिरावला. तर तिकडे निफ्टी 106 अंकांनी उडी मारून 17,929 वर व्यापार करत आहे.
शेअर बाजार म्हणजे काय?
शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता होय. इथं एक दिवसात लाखो रुपये कमावणारा व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली येतो. त्यामुळे शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक करावी लागते. जर नुकसान झाले तर त्यांची जोखीम सहन करण्याची तयारी असावी लागते. एकेकाळी शेअर बाजार हा फक्त श्रीमंत उच्च वर्गाने विचार करण्याचा विषय आहे, असं मानलं जाई. कालांतराने हे चित्र बदलत गेलं आणि आता बहुतांश सर्वच वर्गातील लोकांनी आपली पावलं या दिशेने वळवली.
गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला, तेव्हा त्याचे पडसाद हे शेअर बाजारात उमटताना दिसले. परंतु या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. तरीही शेअर बाजारात 2020 च्या तुलनेने पडझड कमी स्वरूपात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -जालना : कसुरी नदीवरील पुलावरून बस कलंडली, 2 लहान मुलांसह 25 प्रवाशी सुखरूप