महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर रेल्वेमधील गुन्हेगारी टाळता येईल - उज्ज्वल निकम - उज्वल निकम

कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना जागरुक राहण्याचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिले तर रेल्वेमधील गुन्हेगारी टाळता येऊ शकते. असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.

Ujjwal Nikam
उज्ज्वल निकम

By

Published : Nov 2, 2020, 8:08 PM IST

मुंबई - देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या सभोवताली जागरूक व दक्ष राहून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावताना जागरुक राहण्याचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिले तर रेल्वेमधील गुन्हेगारी टाळता येऊ शकते असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. मध्य रेल्वेच्या दक्षता सप्ताहात मुख्य पाहुणे म्हणून ते उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.

रेल्वे प्रवासीही प्रवास करताना जबाबदारीने वागून या प्रयत्नात सामील होऊ शकतात. दहशतवादी हल्ल्यात रेल्वे कर्मचा्र्‍यांच्या परिस्थिती हाताळण्याचे गांभीर्य व भूमिकेचे त्यांनी स्मरण केले व त्याचे कौतुक केले. प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विभागाचे प्रधानाध्यक्ष, सर्व विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि मध्य रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी वेब लिंकद्वारे या कार्यक्रमात सामील झाले होते.

यावेळी एस. के. पंकज, वरिष्ठ उप महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता अधिकारी यांनी प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून दिली आणि या प्रसंगी त्यांना बोलण्याचे आमंत्रण दिले. मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक व मुख्य दक्षता अधिकारी एस.के. पंकज यांनी कार्यक्रमाचे समारोप व आभारप्रदर्शन केले. यापूर्वी उज्ज्वल निकम यांच्या विषयीचा चित्रपटही उपस्थितांना दाखविण्यात आला होता.

दक्षता जागरूकता सप्ताहाचा भाग म्हणून ऑनलाईन सेमिनार, क्विझ स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, हिंदी निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कर्मचारी तक्रार निवारण शिबीर आणि दक्षता अधिकारी व निरीक्षक यांचे ऑनलाइन आंतर-सक्रिय सत्र आयोजित केले गेले. दक्षता जागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचारा विरूद्ध जागरूकता करण्यासाठी अॅनिमेटेड चित्रफितींचे ई-लाँचिंगही करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details