मुंबई - कोरोना विषाणूच्या संक्रमनावर मात करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. 3 मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने याचा त्रास समाजातील सर्वच स्तरात होत आहे. असे असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी लॉकडाऊनचा हा काळ अधिक आव्हानात्मक असल्याचे समोर येत आहे. रोजचा व्यायामाचा दिनक्रम ठप्प झाल्याने आता ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारी समोर यायला लागल्या आहेत.
लॉकडाऊनचा काळ ज्येष्ठ नागरिकांसाठी कठीण, आरोग्य समस्या भेडसावताहेत - ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग जोरदार खेळण्यासाठी स्वतःला फिट ठेवणे महत्वाचे आहे. याच कारणास्तव रोज सकाळ - संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक हे मैदानात व्यायाम करताना, योग करताना किंवा लाफ्टर थेरपी करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, कोरोना संक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिकांचे घराबाहेर पडणे आता बंद झाल्याने बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग जोरदार खेळण्यासाठी स्वतःला फिट ठेवणे महत्वाचे आहे. याच कारणास्तव रोज सकाळ - संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक हे मैदानात व्यायाम करताना, योगा करताना किंवा लाफ्टर थेरपी करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, कोरोना संक्रमनामुळे ज्येष्ठ नागरिकांचे घराबाहेर पडणे आता बंद झाल्याने बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. यामुळेच, वृद्धांसाठी सध्याची परिस्थती म्हणजे 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झाली आहे. मॉर्निंग वॉक किंवा मैदानातील व्यायाम बंद झाल्याने घरी बसून ज्येष्ठांच्या उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपर टेन्शन, मानसिक तणाव, अपचन, निद्रानाश, सांधेदुखी या आजारात वाढ झाली आहे. मॉर्निंग वॉक, इव्हेनिंग वॉक केला तर वरील आजार होण्याची शक्यता कमी असते. पण, लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या भीतीने वृद्धांना घराबाहेर जाता येत नाहीये.
लॉकडाऊनच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अधिक टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यात डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडून सध्या घर बसल्या ऑनलाईन उपचार व समुपदेशनही सुरू आहे. घरबसल्या बैठे व्यायाम, योगासने, या बरोबरच अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करून आरोग्य चांगले ठेवले जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मनावर कुठलेही दडपण न घेता या गोष्टींचा नित्यनियमाने अवलंब केल्यास लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सहज पार करत पुन्हा ज्येष्ठ नागरिक हे मैदानात उतरतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.