मुंबई- दिल्लीत घडलेला हिंसाचार मुंबई सुद्धा घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी यासंदर्भात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपली कंबर कसत मुंबईमध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमण्यास मनाई केलेली आहे. ही जमावबंदी 9 मार्च, 2020 पर्यंत राहणार असून या दरम्यान मुंबई पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
दिल्लीतील हिंसाचारा दरम्यान जाळपोळ मारहाण दगडफेक करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला होता. त्यापेक्षाही मोठा हिंसाचार मुंबई घडवला जाऊ शकतो, अशी सूचना गुप्तचर विभागाने दिली आहे. शिवाय मुंबईत सध्या अधिवेशन सुरू असून त्याच सीएए व एनआरसीविरोधात अनेक आंदोलने केली जात असल्यामुळे यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.