अदानीची जेपीसी मार्फत चौकशी व्हावी नाना पटोले मुंबई :राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जेपीसीच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले आहे. अदानी समूहाच्या वीस हजार कोटी रुपयांबाबतच्या प्रश्नांनी संसदेत घेतल्यानंतर या प्रश्न जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने काँग्रेसने लावून धरली आहे. मात्र, असे असले तरी काँग्रेसच्या आघाडीतील मित्र पक्षांनी याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसते.
आमच्या भूमिकेवर ठाम पटोले :महाविकास आघाडीतील पक्षांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत असलेली भूमिका असेल अथवा अदानी यांच्या चौकशीसाठी असलेली आग्रही भूमिका असेल किंवा पंतप्रधानांच्या चौकशी बाबतच्या जेपीसीची मागणी असेल सर्व मुद्द्यांवर आम्ही आजही ठाम आहोत. आमच्या सोबत असलेल्या राजकीय पक्षांची भूमिका वेगळी असू शकते. प्रत्येक पक्षाचा त्याचा अजेंडा असतो, त्यांची स्वतःची भूमिका असते. त्यामुळे त्याबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही. मात्र, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस अडचणीत - अनिकेत जोशी :महाविकास आघाडीमधील काँग्रेसची एकूण भूमिका, काँग्रेसची झालेली गत पाहता काँग्रेस अडचणीत आहे, हे स्पष्टपणे दिसते. काँग्रेस संख्यात्मक दृष्ट्या ही आघाडीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच काँग्रेसने आपली वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसला सध्या तरी एकला चलो रे या भूमिकेवर जावे लागले आहे असे मत अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांमध्ये आपापसात असलेला बेवनाव आणि घटलेलं लोकप्रियता यामुळे काँग्रेस राज्यात अडचणीत सापडल्याचे दिसते आहे. त्यातच काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाने सावरकरांबाबत घेतलेली भूमिका ही राज्यातील काँग्रेस जणांनाही पटणारी नाही त्यामुळे त्याबाबतीतही काँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस जरी स्वबळावर लढण्याचा विचार करीत असली तरी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला आघाडी शिवाय पर्याय नाही हेही दिसत आहे त्यामुळे एकूणच काँग्रेस सारख्या पक्षाची आघाडीमध्ये कुचंबना होत असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
जागा वाटपातही काँग्रेसला माघार घ्यावी लागेल : सध्या महाविकास आघाडीत असलेल्या तीन पक्षांमध्ये काँग्रेस हा सर्वात छोटा पक्ष आहे. आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागेल असे चित्र दिसत आहे त्यामुळे जागा वाटपातही काँग्रेसच्या वाट्याला आता किती जागा येणार हा कळीचा मुद्दा ठरू शकतो असेही जोशी म्हणाले.
हेही वाचा - Jayant Patil On BJP : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण