महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विज्ञान दिन विशेष: 'या' महिला वैज्ञानिकाने इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम केली फत्ते - science day specia

२२ जुलै २०१९ रोजी या रितू करिधाल यांनी चंद्रयान-२ या अवकाश यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठीची वाट मोकळी करून दिली होती. आपल्या अफाट बुद्धिमत्तेने त्यांनी भारताला अवकाश क्षेत्रात उच्च शिखरे गाठण्यास मदत केली.

chadrayan 2, ritu karidhal, isro, mumbai
रितू करिधाल

By

Published : Feb 28, 2020, 5:28 PM IST

मुंबई- कोट्यावधी भारतीयांच्या आकांक्षांचे ओझे वाहत जीएसएलव्ही प्रक्षेपक चंद्रयान २ ला घेऊन अवकाशात झेपले आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृष्य पाहून देशवासीयांचे ऊर गर्वाने फुलून गेले. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याच्या भारताच्या मोहिमेला चांगली सुरूवात मिळाली. हे स्वप्न साकार केले मुथय्या वनीथा आणि रितू करिधाल या इस्रोच्या २ महिला वैज्ञानिकांनी. यातील रितू करिधाल या चंद्रयान-२ या मोहिमेच्या संचालिका होत्या. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने रितू यांच्या कार्याचा घेतलेला हा एक आढावा. पाहा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.

२२ जुलै २०१९ रोजी रितू करिधाल यांनी चंद्रयान-२ या अवकाश यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठीची वाट मोकळी करून दिली होती. आपल्या अफाट बुद्धीमत्तेने त्यानी भारताला अवकाश क्षेत्रात उच्च शिखरे गाठण्यास मदत केली. रितू यांचा जन्म उत्तप्रदेशच्या लखनऊ या शहरात झाला होता. मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेल्या रितू आभ्यासात हुशार होत्या. लहानपणापासूनच त्यांना आकाशातील तारे आणि ग्रहांविषयी कृतूहल वाटायचे. चंद्राचा आकार कसा काय बदलतो. हे जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासा असे. पुढे सृष्टीचे हेच गूढ जाणून घेण्याची जिज्ञासा उराशी बाळगत त्यांनी भारतीय वैज्ञानिक संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आणि नंतर त्या १९९७ साली इस्त्रोत कामाला लागल्या.

मंगळयान आणि चंद्रयान-२ निर्मिती मोहिमेत अतुलनीय योगदान देणाऱ्या करिधाल यांच्या कार्याचा आढावा

काही काळानंतर इसरोने रितू यांना मंगलयान या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या उप संचालकपदी नियुक्त केले. मंगळयानाला मंगळाच्या कक्षेत स्थिरवायचे होते. या कामासाठी बुद्धीचा चांगलाच कस लागणार होता. मात्र, रितू आणि इस्रोतील वैज्ञानिकांनी ही कामगिरी यश्वस्वीरित्या पूर्ण केली आणि मंगळयानाला मंगळाच्या कक्षेत पोहोचवूनच दम घेतला. ही मोहीम फत्ते करून रितू यांनी निर्विवादपणे आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि भारत हा मंगळावर पोहोचणाऱ्या काही मोजक्या देशांच्या श्रेणित पोहोचला.

२०१९ साली इस्रोने रितू करिधाल यांना चंद्रयान-२ मोहिमेच्या संचालकपदी नियुक्त केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविण्यात आजतागायत फक्त पूर्व सोवियत युनियन, अमेरिका आणि चीन या देशांनाच यश आले होते. मात्र, चंद्रयान-२ ही मोहीम फतह करून भारत हा चौथा देश होणार होता. रितू करिधाल आणि हजारो वैज्ञानिकांनी यासाठी प्रयत्न केले. मात्र, या मोहिमेला गालबोट लागले. मात्र, हार न मानता आजही इस्रो या अभियानासाठी प्रयत्न करतो आहे.

आज रितू करिधाल या युवा वैज्ञानिकांच्या आदर्श बनल्या आहेत. नौकरी आणि कुटुंब सांभाळत रितू यांनी हे यश संपादन केले. आव्हानांना समजून त्यावर काम केले. आणि अवकाश क्षेत्रात देशाचे नाव लौकिक केले. मुल, चूल आणि नोकरी हे तिन्ही काम महिला सक्षमपणे पार पाडू शकता हे रितू यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या कर्तुत्वाला 'ईटीव्ही भारत'चा सलाम.

हेही वाचा-ओबीसींची जातनिहाय जनगणना अशक्य, केंद्राने फेटाळला राज्याचा प्रस्ताव

ABOUT THE AUTHOR

...view details