मुंबई- मुलुंड पूर्वेच्या सौ. लक्ष्मीबाई इंग्रजी माध्यम शाळेमार्फत शनिवारी विद्यार्थ्यांकडून छत्री रंगविण्याच्या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर सुंदर पावसाळी संदेश रेखाटले.
मुलुंडमध्ये विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर रेखाटले पावसाळी संदेश - students wrote beautiful rainy messages on umbrellas
रंगावली ठाणे या संस्थेतर्फे आपली छत्री रंगवून सुरेख कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रंगावली ठाणे या संस्थेतर्फे आपली छत्री रंगवून सुरेख कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विध्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विध्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करुन एकाहून एक सुंदर अश्या छत्र्या रंगविल्या. 9 ते 12 वयोगटातील विध्यार्थ्यांनी रंगांमध्ये दंग होत छत्र्यांवर निसर्ग संदेश रेखाटलीत.
शाळेचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही अनोखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण चित्रातून रेखाटणे हा या कार्यशाळे घेण्यामागचा उद्देश्य होता. यावेळी विद्यांर्थ्यांकडून वेगवेगळ्या रंगाची ओळख करण्यात आली. तसेच पावसाळी वातावरणात व श्रावण सरींचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी छत्र्यांवर निसर्ग व पर्यावरण पूरक संदेश रेखाटले. पावसाळी वातावरणात हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.