महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील शालेय बस मालक-चालक कोरोनामुळे आर्थिक संकटात - मुंबई लेटेस्ट न्यूज

स्कूल बस व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍या चालक, क्लीनर मदतनीस व महिला सहाय्यक आदींच्या हाताचे काम गेले आहे. स्कूल बस, व्हॅन या जागेवरच उभ्या असल्यामुळे गाड्यांचा हप्ता कसा भरायचा असा प्रश्न आहे असल्याचे वाहनधारक सांगतात. मुंबईत तब्बल 24 हजार जणांवर यामुळे बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.

मुंबईतील शालेय बस मालक-चालक
मुंबईतील शालेय बस मालक-चालक

By

Published : May 4, 2021, 8:19 PM IST

मुंबई - राज्यात 40 हजारपेक्षा जास्त स्कूल बस व व्हॅन धावतात. यातील अनेकांनी बँका किंवा इतर वित्तसंस्थांकडून व्हॅन खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. टाळेबंदीमुळे यातील बस मालकांसह व्हॅनधारकांचे हप्ते थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी बँकांकडून तगादा सुरु आहे. गाड्यांच्या वाढत्या किमती, वाहन कर्जाचा हप्ता, डिझेल दरवाढ, चालक, मदतीनस, महिला सहाय्यक यांचा पगार, विम्याच्या हप्त्याच्या रकमेत झालेली वाढ, गाडी पासिंगच्या शुल्कात झालेली वाढ आदींचा खर्च पाहता स्कूल बस चालकांचे कंबरडे मोडले आहे. या क्षेत्रास सरकारी मदतीची गरज असून सरकारने आम्हाला काही तरी काम द्यावे. शाळेच्या गाड्या जनवाहतूक करण्यासाठी घेण्यात आल्या तर अडचणी सुटतील, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी रमेश मनिअन यांनी सांगितले आहे.

शालेय बस मालक-चालक कोरोनामुळे आर्थिक संकटात
'गाड्यांचा हप्ता कसा भरायचा?'राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन व्हॅन चालकांना दिलासा द्यावा, तसेच ज्यांचे हप्ते थकले आहेत, त्यांचे व्याज माफ करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोनामुळे शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद असल्याने स्कूल बसचे चाकही रुतले आहे. स्कूल बस व्यवसायावर उदरनिर्वाह करणार्‍या चालक, क्लीनर मदतनीस व महिला सहायक आदींच्या हाताचे काम गेले आहे. स्कूल बस, व्हॅन या जागेवरच उभ्या असल्यामुळे गाड्यांचा हप्ता कसा भरायचा असा प्रश्न आहे असल्याचे वाहनधारक सांगतात. मुंबईत तब्बल 24 हजार जणांवर यामुळे बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. 'बस मालकांवर आत्महत्या करण्याची वेळ'सरकारकडून कोणत्याही बस मालकांना मदत मिळाली नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वाचे दरवाजे आम्ही मदतीसाठी ठोकवले आहेत. मात्र केवळ आश्वासने मिळाली आहे. आमचे जे ईएसआयसीचे पैसे पडून आहेत तेच मागितले आहेत, मात्र तेही दिले जात नाहीत. सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नाही. यामुळे शालेय बसमालकांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे बस मालकांनी सांगितले आहे.बस मालकावर मिळेल ते काम करण्याची वेळकोरोनामुळे बस चालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यांच्याकडे आठ ते दहा गाड्या आहेत, पण त्या उभ्या आहेत. बस चालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे पर्याय शोधावे लागत आहेत. काही बस मालक गाड्या धुणे, गाडीवर चालक म्हणून काम करणे आदी कामे करत असल्याचे पहायला मिळत आहे.'शाळेच्या गाड्या जन वाहतुकीसाठी वापरू'

सरकारकडून कोणत्याही प्रकारची अद्याप मदत मिळाली नाही. त्यात कर्जाचा डोंगर मोठा आहे. अशात बेस्टकडून जर शाळेच्या गाड्या जनवाहतूक करण्यासाठी घेण्यात आल्या तर अडचणी सुटतील. यात गाड्या देखील छोट्या असल्याने वाहतुकीस अडचण होणार नाही आणि बेस्टला देखील याचा फायदा होईल. यासाठी आम्ही अत्यंत कमी किमतीत गाड्या देऊ, अशी प्रतिक्रिया स्कूल बस ओनर असोसिएशनकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-वा, कौतुकास्पद…! शाळेचे मुख्याध्यापक झाले बहुरूपी, ग्रामस्थांमध्ये केली जनजागृती

ABOUT THE AUTHOR

...view details