मुंबई - पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ या अंतर्गत 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सध्या विचार जागरण सप्ताह सुरू आहे. २८ मे पर्यंत हा सप्ताह आयोजित केला आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे.
सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये भव्य थीम पार्क व संग्रहालय बांधणार - मंगल प्रभात लोढा
भगूरमध्ये सावरकरांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर थीमपार्क उभारण्यात येणार आहे. तसेच सावरकर संग्रहालय बांधण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.
थीम पार्क आणि संग्रहालय - पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येणार आहे. सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये अभिवादन यात्रा,
लिटरेचर फेस्टिव्हल, गीत वीर विनायक, वीरता पुरस्कार महानाट्य, कौतुक सोहळा आणि किर्तनसेवा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू समाजाच्या एकतेचा पाया घातला. येथे त्यांनी सर्व जातीच्या हिंदूंना मुक्त प्रवेश असलेले पतितपावन मंदिर उभारले आणि मुलींसाठी शाळाही सुरू केली. अंदमाननंतर येथील कारागृहात त्यांनी दोन अडीच वर्षे कारावास आणि १३ वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा भोगली आहे.
आगामी कालावधीत मानसून धमाका - नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात आणि अभिनव भारताची स्थापना केली. सांगली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर काही काळ वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले. तेथे त्यांचे स्मारक आहे. पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी केली. मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आयुष्याच्या शेवटच्या वर्षात ते इथेच राहिले. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून येथेच सावरकर सदनमध्ये त्यांनी आत्मर्पण केले. वरील पाच ठिकाणी जयंती सप्ताहाच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती लोढा यांनी दिली. तसेच आगामी कालावधीत मानसून धमाका हा पर्यटन विभागामार्फत उपक्रम राबवला जाणारा आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला यंदा ८ कोटी रुपयांचा नफा देखील मिळाला आहे. या विभागाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले आहे.