महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फरक नाय पडला तर मिशाच काय, भुवया पण काढीन; उदयनराजेंचे निवडणूक आयुक्तांना चॅलेंज - खासदार उदयनराजे भोसले

कोणतेही मशीन फूलफ्रुफ नसते. आपल्याच आपली  गॅरंटी  देता येत नाही. माणूस ही एकच फूलफ्रुफ मशीन आहे. वेगवेगळ्या  थेअरी येत आहेत. संगणक हँक होत असताना ईव्हीएम का हॅक होणार नाही, असे उदयनराजे म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसलें

By

Published : Jun 24, 2019, 5:00 PM IST

Updated : Jun 24, 2019, 5:15 PM IST

मुंबई- ईव्हीएम मशिनमधे व्हायरस जात असेल तर संसदेतही व्हायरस घुसताहेत. मी प्रामाणिक खरं बोलणार खासदार आहे. माझं ओपन चॅलेंज आहे... मी खासदारकीचा राजीनामा देतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना माझं चॅलेंज आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात बॅलेटवर परत मतदान घ्या. मी माझ्या खर्चानं निवडणूक करतो...नाय फरक पडला तर मिशा नाय...भुवया पण काढीन, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले.

कोणतेही मशीन फुलफ्रुफ नसते. आपल्याच आपली गँरंटी देता येत नाही. माणूस ही एकच फूलफ्रुफ मशीन आहे. वेगवेगळ्या थेअरी येत आहेत. संगणक हँक होत असताना ईव्हीएम का हॅक होणार नाही, असे उदयनराजे म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले
ही माझी पत्रकार परिषद आहे, कोणा पक्षाच्या विरोधात नाही ना समर्थनार्थ. भारत देश सर्वधर्मनिरपेक्षतेचा देश आहे. फाळणीच्या वेळी झालेला रक्तपात पुन्हा होऊ नये. मी देशाचा सेवक म्हणून माझे मत व्यक्त करत आहे. लोकशाहीत संविधान अबाधित रहावे यासाठी ही पत्रकार परिषद आहे, असे उदयनराजे म्हणाले.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी ईव्हीएमकडे सामाजिक आणि आर्थिक अंगाने पाहतोय. केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेच्या करापोटीच्या वसुलीवर चालते. जनतेच्या कराची उधळपट्टी करण्याचा अधिकार आम्हा कोणालाच नाही.

फुलफ्रुफ म्हणजे काय १ एप्रिलचे फुल कि Fool ते सांगा?

निवडणूक अधिकाऱ्यांची कागदपत्रे मी घेऊन आलोय. सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि मोजणीच्या मतदानामधे मोठा फरक आहे. ईव्हीएममुळे मला अडीज लाख मते कमी पडली. एका ईव्हीएमची किमंत ३३ हजार रुपये आहे. त्याहून एका मतदानाची किंमत मोठी आहे. देशात या मशिनसाठी ५ हजार कोटीचा खर्च होत आहेत.

ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघांतून मतांमध्ये तफावत आढळून आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये राज्यातदेखील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. आता सातारा लोकसभेतून विजयी झालेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मतमोजणीतील फरकावरून चौफेर टीका केली आहे.
लोकसभा मतदारसंघात आपल्याला साडेतीन ते पावणेचार लाखांचे मताधिक्य आहे. मी राजीनामा देतो. पुन्हा फेरमतदान होऊ दे, तितक्याच मताधिक्क्याने निवडून येईन, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. ईव्हीएम मशीनमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप उदयनराजे यांनी करत, ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती उखडून टाकायला हवी, असे वक्तव्य केले.

दरम्यान, ईव्हीएम मशीनवरून होणार्‍या निवडणुकांना त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातील मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत मी आता राजीनामा देतो. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान उदयनराजे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.

सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने या विषयावर भाष्य करायला हवे; मात्र, या विषयावर दाद मागणार्‍यालाच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणार्‍या या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाही तर सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मी एका निवडणुकीत पडलो तरीसुद्धा रडलो नाही. आता तर मी विजयी झालो आहे. मी रडीचा डाव खेळत नाही. देशभरात ३७६ मतदारसंघांत घोळ झाल्याचा संशय आहे. आयोगाने पोर्टलवरून आकडेवारी हटवल्याने संशय आणखीनच वाढला आहे. आम्ही म्हणेल तोच कायदा, म्हणे व्हायरस शिरला मशीनमध्ये. न्यायालयात जावे तरी न्यायालय तक्रारदारालाच बंधने घालत आहे. आता माझ्या सातारा मतदारसंघात आकडेवारीत घोळ आहे, आता काय करणार न्यायदेवता? सरळ चिठ्ठ्या टाकून लोकप्रतिनिधींची निवड करा. कशाला निवडणुकीवर खर्च करता, असे म्हणत उदयनराजेंनी ईव्हीएम मशीनवर निशाणा साधला.

माझी खासदारकीचा राजीनामा द्यायची तयारी आहे. कोणीतरी सांगा मी खोटं बोलतोय. निवडणूक आयोगाने चॅलेंज स्वीकारलं नाही तर लोकं मशीन फोडतील.राजे-प्रतिष्ठान सामाजिक कार्यात काम करत आहे. निवडणुकीशी आमचा संबंध नाही असे उदयनराजे शेवटी म्हणाले.

Last Updated : Jun 24, 2019, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details