महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut News : '31 डिसेंबरनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार', मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा - संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut News : शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाहीत. या शिवसेनेच्या शाखा बाळासाहेबांच्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंशी तुमचे काहीही नाते नाही. मिंधे गट हे भाजपाचे मांडलिक आहेत, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय.

Sanjay Raut
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 2:24 PM IST

आम्हाला राज्याचं वातावरण बिघडवायचं नाही

मुंबई Sanjay Raut News :मुंब्र्यात ठाकरे गटाची शाखा तोडण्यात आली होती, त्या शाखेची पाहणी करण्यासाठी शनिवारी (11 नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुब्र्यात गेले होते. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्यानं पोलिसांनी उद्धव ठाकरेंना शाखेपासून काही मीटर अंतरावरच अडवून माघारी पाठविले. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याच पार्श्वभूमीवर आज (12 नोव्हेंबर) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शाखा शिवसेनेची असून शिवसेना ठाकरेंची आहे. यांची सत्ता घटनाबाह्य आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेच्या शाखा त्यांच्या मालकीच्या होत नाहीत. 31 डिसेंबरनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटाला दिला.


डुबलीकेट शिवसेनेचा माज शिवसैनिकांनी उतरवला :डुप्लीकेट शिवसेनेनं जो माज दाखवला, तो माज काल (शनिवारी) हजारो शिवसैनिकांनी उतरवला. ते सत्तेच्या जोरावर ते फुरफुरत होते. त्यांचं काय करायचं ते पाहू. यापुढं कुठल्याही शाखेवर आक्रमण किंवा अतिक्रमण केलं तर काल फक्त एक झलक होती. याच पद्धतीनं सामुदायिकपणे तोडीस तोड उत्तर आणि प्रतिहल्ला केला जाईल. काल पोलिसांनी चोरांचं रक्षण केलं हे पोलिसांचं काम नाही. आम्हाला राज्याचं वातावरण बिघडवायचं नाही. जेव्हा गद्दारांच्या हातात सत्ता जाते, तेव्हा ते रावण होतात, असा घणाघातही त्यांनी केलाय.


शिवसेनेच्या शाखा तुमच्या बापाच्या नाहीत : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, तुम्हाला शिवसेनेचा इतिहास माहित नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार माहीत नाही. भाजपाच्या प्रचाराला चार राज्यात जाणार आहेत, तिकडे ते खोके घेऊन जाणार आहेत. चार राज्यात प्रचाराला जाण्यापेक्षा मुंबई, ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या आणि इथं प्रचार करा. ही हिंमत दाखवा, असं राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं.

हेही वाचा -

  1. Shinde Group Criticizes Sanjay Raut : संजय राऊत विकृती, शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल
  2. Sanjay Raut on EC : शिवसेना कुणाची? पाकिस्तानला माहिती, पण निवडणूक आयोगाला नाही-संजय राऊत
  3. Thackeray vs Shinde : राज्य सरकार घटनाबाह्य, यावरच बुलडोजर फिरवण्याची गरज- खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details