मुंबई -एकीकडे युतीचे सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करत दुरीकडे सक्षम विरोधी पक्ष हवा म्हणून विरोधी पक्षाला ही खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी संपूर्ण कुटुंबासह भांडुपमध्ये मतदान केले. या वेळी ते बोलत होते.
हेही वाचा-विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत भाजप आमदारांना ही राऊत यांनी टोला दिला. लोक पावसात ही मतदान करत आहेत. महायुतीच्या बाजूने लोक मतदान करतील. विरोधी पक्ष टिकला पाहिजे. आमच्या समोर एक उत्तम विरोधी पक्ष असावा, विरोधी पक्ष असेल तर सत्ताधाऱ्यांवर वचक रहातो. अधिक उत्तम प्रकारे काम केले जाते. त्यामुळे विरोधी पक्षाला ही शुभेच्छा देतो. धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यामुळे त्याचं राजकारण करणे योग्य नाही. या अगोदर भाजपच्या आमदारांनी ही अशीच महिलांबाबत वक्तव्य केली होती. त्यांच्या जागी आता धनंजय मुंडे आले आहेत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.