मुंबई - विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने दुसरा अतिरिक्त उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. मात्र, तिन्ही पक्षाच्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, असे काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केल्याने आघाडीतील तणाव निवळला आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राङत यांनी ट्वीट करुन बळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे आभार मानले.
विधानपरिषद निवडणूक: संजय राऊतांनी मानले काँग्रसचे आभार - Election of Legislative Council
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले.
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी संख्याबळानुसार भाजप 4 तर महाविकास आघाडीचे 5 उमेदवार निवडून येणे निश्चित असताना, काँग्रेसने अतिरिक्त उमेदवार दिला होता. त्यामुळे निवडणूक लढली जाणार होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न चालवला होता. मात्र, काँग्रेसच्या भूमिकेमुळे निवडणूक अपरिहार्य झाली होती. आपला उमेदवार मागे घेणार नसल्याचेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत शिवसेनेचे नेते अनिल परब, सुभाष देसाई संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील उपस्तिथ होते.
आज झालेल्या बैठकीत काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली असून आघाडीचे पाच उमेदवार मैदानात असतील असे भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केल्याने काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या भूमिकेबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे आभार मानले आहेत.