मुंबई : केंद्र सरकार आणि या राज्यातील सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आम्ही सगळे, ठाकरे कुटुंबियांशी सुडाच्या भावनेने वागते हे स्पष्ट होते. नेत्यांची सुरक्षा काढणे व ठाकरे कुटुंबांची सिक्युरिटी काढणे असे अत्यंत खालच्या पद्धतीचे उद्योग हे सरकार करत आहे. या सरकारची बौद्धिक आणि वैचारिक पातळी ही तेवढीच असल्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. त्यांना त्याच्यातच मजा वाटते. पण, या कर्माची फळ त्यांना भोगावे लागेल हे मी सांगतो. राज्यासह देशातील महत्त्वाच्या विविध मुद्द्यांवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, मातोश्री सिक्युरिटी काढणे, ठाकरे कुटुंबाचे सिक्युरिटी काढणे, शिवसेनेच्या नेत्यांचे सिक्युरिटी काढणे यातच सरकारचा वेळ चालला आहे कटकारस्थान करणे सुडाच्या कारवाया करणे त्याच्या पलीकडे या सरकारच पाऊल पडताना मला दिसत नाही. आता यासंदर्भात काय करायचे आम्ही पाहू. या गोष्टीमुळे यांना वाटत असेल आम्ही माघार घेऊ शरण जाऊ.. तर हा गैरसमज आहे.
तशी हिंमत आहे का?-दादा भुसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मी त्यांचा भ्रष्टाचार उघड केला आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही? काल देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत सांगत होते ना? काय झाले कोणी चुकीच केले? केंद्र सरकारच्या एजन्सी पोलिसांऐवजी घुसतात. हा या सरकारच्या गृहमंत्राचा अपमान आहे. जर कोणी फ्रॉड केले, चोरी केली तर पोलीस आहेत ना.. इथे! राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गणेश सहकारी कारखान्यात त्यांचा पराभव का झाला? तर हा तुमच्या भाजपच्याच लोकांनी पराभव केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेत झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का देतो? हिम्मत आहे, फडणवीस यांची चौकशी करण्याची किंवा ईडीची तशी हिंमत आहे का?