मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Leader Sanjay Raut) यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Sanjay Raut on Rahul Gandhi ) गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेमुळे (Sanjay Raut on Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवे तेज आणि चमक मिळाल्याचा दावा संजय राऊत यांनी रविवारी केला. ते पुढे म्हणाले की, 2023 मध्येही हाच कल कायम राहिला तर पुढील लोकसभा निवडणुकीत देशात राजकीय बदल घडू शकेल.
2024 मध्ये सत्ता बदल होईल - संजय राऊत म्हणाले की, आशा आहे की 2023 मध्ये देश भयमुक्त' होईल, जे काही होत आहे ते सत्तेचे राजकारण आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वी होऊन आपला उद्देश साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की, 2022 या वर्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला नवी चमक आणि आशा दिली आहे. त्यामुळे 2024 मध्ये सत्ता बदल होईल, असे भाकीतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले आहे.