मुंबई - शिवसेनेचा पाच वर्ष नाही तर पुढील 25 वर्षे मुख्यमंत्री राहील. मात्र, आम्ही कधी 'मी पुन्हा येईन' असं म्हणणार नाही. असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली. राऊत यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली - देवेंद्र फडणवीस
किमान समान कार्यक्रमाने सरकार चालवता येते तसेच राज्याचा विकासही करता येतो. असे म्हणत संजय राऊत यांनी सरकार चालवताना वेगवेगळ्या विचारधारांचा अडसर येत नसल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत
हेही वाचा - 'काँग्रेससाठी देशहितापेक्षा राजकारण महत्त्वाचे; त्यांनी देशाची माफी मागावी'
पत्रकार परिषदेतील मुद्दे -
- शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी गेल्या कित्येक वर्षापासून काम केलेले आहे.
- शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येणार
- आम्ही पुन्हा येईन असं कधीही म्हणणार नाही
- आम्हाला वाटंत येणारे 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा.
- लवकरच समान मुद्द्यावर ठरलेला कार्यक्रम सांगितला जाईल
- वीर सावरकर यांना या अगोदरच का भारतरत्न का दिला नाही.
- आम्ही सावरकरांना सुरुवातीपासून मानत आलेलो आहोत. आम्ही हा मुद्दा उचलून धरलेला आहे
- माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे महाराष्ट्रासाठी मोलाचे योगदान
- नारायण राणे यांना भाजपचे सरकार बनवण्यासाठी शुभेच्छा
- किमान समान कार्यक्रमाने सरकार चालवता येते. राज्याचा विकास करता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारांचा अडचण येणार नाही