महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut Defamation Claim: संजय राऊत यांचा किरीट सोमय्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा; जाणून घ्या कारण... - Sanjay Raut Defamation Claim

उबाठा शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोविड सेंटरच्या संदर्भात शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला. त्यांना नवाब मलिक यांच्यासोबत जाऊन बसावे लागणार, अशा प्रकारचे बदनामीकारक ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते. त्यांच्या या सार्वजनिक विधानाच्या विरोधात संजय राऊत यांनी मुलुंड न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे.

Sanjay Raut Defamation Claim
जाणून घ्या कारण

By

Published : Jun 12, 2023, 11:06 PM IST

संजय राऊतांच्या वकिलांची प्रतिक्रिया

मुंबई:किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांची राजकीय आणि न्यायालयीन लढाई ही गेल्या महाविकास आघाडी शासन स्थापनेच्या आधीपासून सुरू होती. आता ती उत्तरोत्तर रंगत चाललेली आहे. मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये संजय राऊत यांनी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात खटला दाखल केला. मुलुंड न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तो दाखल करण्यात आला आहे.



सोमय्यांचे आरोप बेजबाबदारीचे:खासदार किरीट सोमय्या यांनी जानेवारी, जुलै, ऑगस्ट 2022 या काळामध्ये सार्वजनिकरित्या आपल्या ट्विटर खात्यावरून संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. हे आरोप बेजबाबदार तसेच बदनामी करणारे असल्याचे संजय राऊत यांचे याचिकेमध्ये म्हणणे आहे. संजय राऊत यांनी याचिकेमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे देखील अधोरेखित केलेले आहे. त्यानुसार ते गेल्या 30 वर्षांपासून सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत आहेत. चार वेळा ते लोकप्रतिनिधी म्हणून संसदेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दहा लाखांपेक्षा अधिक फॉलोवर आहेत; तर किरीत सोमय्या यांच्या अकाउंटवर त्यांच्यापेक्षा कमी संख्येने फॉलोअर्स आहेत. 2013 पासून ट्विटरवर संजय राऊत कार्यरत आहेत.


बदनामीकारक वक्तव्ये कोणती?9 ऑगस्ट 2022 रोजी " संजय राऊत का मुक्काम अब नवाब मलिक जहा है वहा होगा" या प्रकारचे केलेले ट्विट तसेच 24 ऑगस्ट 2022 रोजी किरीट सोमय्या यांनी ट्विट केलेले होते की, 100 कोटी रुपयांचा कोविड सेंटर घोटाळा त्यामध्ये संजय राऊत आणि सुजित पाटकर आहेत. अशा अर्थाचे केलेले ट्विट 22 जानेवारी 2022 रोजी पुन्हा, संजय राऊत आणि सुजित पाटकर शंभर कोटी रुपयांचा ट्विटर घोटाळा बाबत सार्वजनिक ट्विट केले होते. 13 जून 2022 रोजी किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेले थेट असे की, संजय राऊत गुंडागिरी करतात दुसऱ्यांना धमकी देतात. तर 13 जून 2022 रोजी संजय राऊत हे भ्रष्टाचारी आहेत आणि यासंदर्भात राज्यसभा निवडणुकीच्या वेळी संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला, असे ट्विट केले होते.



काय म्हणाले राऊतांचे वकील?संजय राऊत यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली की, किरीट सोमय्या यांनी राऊतांची बदनामी केलेली आहे. म्हणून याचिका दाखल होत आहे. तसेच ते खासदार असूनही बदनामी करतात. म्हणून उच्च न्यायालयाने यापूर्वी किरीट सोमय्या यांना इशारा दिलेला आहे. संजय राऊत चार वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 35 वर्षांपासून ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ते सामनाचे संपादक, लेखक, पत्रकार असून सार्वजनिक जीवनात ते कार्यरत आहेत. त्यांची ही सार्वजनिक प्रतिष्ठा तिच्याविषयी बदनामी करण्यासाठी खोटी विधान करणे यासाठी समाजमाध्यम किंवा पब्लिक प्लॅटफॉर्म यांच्यामार्फत ते बदनामीकारक वक्तव्य करतात. म्हणून त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा मुलुंड न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details