मुंबई- संघ परिवार सर्वांसमोर नैतिकतेचा विषय मांडत असते. मात्र, मोहन भागवत, गोळवलकर गुरुजी, हेडगेवार यांनी संघाच्या स्वयंसेवकांना 'हे'च नैतिकतेचे धडे दिले का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसेच भाजपने नितिमत्ता सोडली असून नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे कृत्य महाराष्ट्राच्या नेत्याने केले असल्याचा अप्रत्यक्ष आरोप देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
संघाने स्वयंसेवकांना 'हे'च नैतिकतेचे धडे दिले का? - संजय राऊत
अजित पवार यांनी केलेला प्रकारामुळे त्यांना महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. ब्लॅकमेल केल्याशिवाय अजित पवारांसारखा नेता कुटुंब आणि पक्ष सोडून जाऊत शकत नाही. ही भाजपच्या अंताची सुरुवात आहे. विश्वाशदर्शक ठराव भाजप सादर करू शकत असता तर पहाटे शपथविधी घेतला नसता. भाजप कोणत्या तोंडाने बहुमत सिद्ध करणार आहे. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवून भाजप बहुमत सिद्ध करणार का? असेही ते म्हणाले.

अजित पवारांना तुरुंग खाते -
धनंजय मुंडेंचा संपर्क राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांशी झाला आहे. त्यांच्यावर दबाव आणल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या स्तरावर गेले आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही, असे राऊत म्हणाले. ज्याप्रकारे राष्ट्रवादीच्या नेत्यांना राजभवनात नेण्यात आले ते एक प्रकारचे अपहरण होते, असा आरोप देखील राऊत यांनी केला. तसेच अजित पवारांना भाजप तुरुंग खाते देईल, असेही ते म्हणाले.