मुंबई : उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढीसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील उद्योगपतींशी आज चर्चा करत आहेत. ताज हॉटेलबाहेर रोड शो देखील होणार ( Yogi Adityanath roadshow in front of Taj Hotel ) आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी, राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांवर निशाणा ( Sanjay Raut criticize BJP ) साधला. भाजप पुरस्कृत राजकारण करण्याचे धंदे बंद करावेत, अशा कानपिचक्यात दिल्या. राहुल शेवाळे यांच्या अब्रुनुकसानीचा देखील राऊत यांनी समाचार घेतला.
उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले ( Yogi Adityanath road show in Mumbai ) आहेत. मुंबईत ते अनेक उद्योगपतींशी चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार आहेत. तसेच ते ताज हॉटेलबाहेर रोडशोही करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे. संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना जोरदर टोला लगावला आहे. योगी मुंबईत रोड शो कशासाठी करत आहेत? आमच्याकडे उद्योग ओरबडून नेणार असाल तर आमचा या रोड शोवर आक्षेप आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय? तिकडे दाओसमध्ये जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असे ही राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे. तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचे योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबईवर अणुबॉम्ब पडला? :शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. राहुल शेवाळेंवर एका तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणाचे वार्तांकन 'सामना', ‘दोपहर का सामना’मध्ये चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगत राहुल शेवाळेंनी करत अब्रनुकसानीचा दावा केला. संजय राऊतांनी राहुल शेवाळेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. राऊत यांना छेडले असता, ते “कुणाकडून? बापरे. होय का? मला वाटलं मुंबईवर अणुबॉम्ब पडला. सोडा हो. अशा खूप नोटिसा येतात”, असे सांगत संजय राऊतांनी शेवाळेंच्या आरोपांचा फुटबॉल ( Rahul Shewale allegation on Sanjay Raut ) केला.
मुंबईच्या रणनीतीसाठी : मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून १२ खासदारांवर जबाबदारी सोपवली आहे. माध्यमांनी याबाबत संजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले. “रणनीती म्हणजे काय हे त्यांना माहिती आहे का? खोके, पेट्या, पाकिटे कुठे कशी वाटायची? ही रणनीती असते त्यांची. मतदार ठरवतील काय करायच ते. ते वाट बघत आहेत, खोकेवाले कधी येत आहेत”, असा सूचक इशाराही संजय राऊत दिला.
पोटातील ओठावर : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यांविरोधात भाजपाकडून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. संजय राऊत यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांना आरसा दाखवाला. बावनकुळेंच्या पोटात होतं ते ओठावर आले. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.