मुंबई Sanjay Raut : मध्य प्रदेश, छत्तीसगडसह 5 राज्यांसाठी निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. तेलंगणात मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलनं राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाचा विजय होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर तेलंगाणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला विजय मिळताना दिसत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजपावर टीका केलीय.
काय म्हणाले संजय राऊत : मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ही पाच राज्यं अत्यंत महत्त्वाची आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम यांच्या एक्झिट पोल याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा तीन डिसेंबरला किंवा प्रत्यक्ष निकाल लागेल तेव्हा त्याच्यावर बोललेलं बरं. पण या पाच राज्यांमध्ये परिवर्तन होणार असून या परिवर्तनाची दिशा 2024 ला दिल्लीतून सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं जाणार असल्याचं राऊत म्हणाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस पक्ष यांनी सर्व राज्यांत वादळ निर्माण केलंय. ही 2024 च्या परिवर्तनाची झलक आहे, असंही राऊत म्हणाले.
पंतप्रधानांना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतं : पुढं बोलताना खासदार राऊत म्हणाले की, कोण कोणत्या राज्यात जिंकेल? काटे की टक्कर आहे. ही काटे की टक्कर होऊ द्या. हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही काँग्रेसमुक्त भारत 2014 पासून घोषणा केली होती. त्याच राहुल गांधींनी, काँग्रेसच्या प्रियंका गांधीनी मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसमुक्त भारत गर्जना करणाऱ्यांना घाम फोडलाय. पंतप्रधानांना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतं. गृहमंत्र्यांना अख्खा देश सोडून निवडणुकीत प्रचार करत फिरावं लागतं. हा काँग्रेसमुक्त भारत नसून 2024 ला तुमच्या बाजूनं तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. ही त्याचीच हवा आहे. राजस्थानसह चारही राज्यात काँग्रेस पक्षाचं सरकार बनेल. इंडिया आघाडीचं मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांबरोबर सरकार बनवेल, असा दावाही संजय राऊतांनी केलाय.
काँग्रेसचा विजय म्हणजे 'इंडिया'चा विजय; पाच राज्यांच्या निकालात दिसेल २०२४ च्या विजयाची झलक - संजय राऊत - इंडिया
Sanjay Raut : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपूर्वी जाहीर झालेला एक्झिट पोल म्हणजे ओपिनिअन पोलची दिशा आहे. ही दिशा म्हणजे 2024 च्या सत्तापरिवर्तनाची झलक असल्याचं संजय राऊत म्हणाले.
Published : Dec 1, 2023, 2:22 PM IST
काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया अलायन्सचा विजय : इंडिया आघाडीबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया आलायन्सचा विजय आहे. केंद्रीय मंत्र्यांना देखील निवडणुकीत उतरवलं. बीजेपीची दशा आणि दिशा काय आहे हे या पाच राज्याच्या निवडणुकामुळं दिसून येत आहे. गुवाहाटी आणि सुरतमध्ये काय होते? महाराष्ट्रामध्ये कोणतं राजकारण होतं? सुरुवात कोणी केली? याचे परिणाम या निवडणुकीत त्यांना दिसतील, असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा :