नवी मुंबई- 'बेळगावमध्ये जाण्यापासून मला रोखायचे असेल तर कायदेशीर पद्धतीने रोखावे. जबरस्तीने रोखू नये,' असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथे पुरेपूर कोल्हापूर या हॉटेलचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
'मला जर बेळगावमध्ये येण्यापासून रोखायचे असेल तर कायद्याने रोखावे' - मुंबई बातमी
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावातील हुतात्मा चौकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुपारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा-''मलाला बायोपिक बनवणे सोपे नव्हते, अजूनही येतात जीवे मारण्याच्या धमक्या''
संजय राऊत हे उद्या (१८ जानेवारी) बेळगावमध्ये एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, सीमा लढ्यात हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावातील हुतात्मा चौकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुपारी कर्नाटक पोलिसांनी अटक केली. त्यांना कानडी सरकारने रोखत धक्काबुक्कीही केली. मराठी लोकांवर अत्याचार करण्याचे अनेक प्रकार बेळगावमध्ये होत आहेत. मराठी भाषेवर, मराठी लोकांवर मराठी साहित्य संमेलनावर सातत्याने बंदी आणली जात आहे. मी बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कानडी सरकारने बंदी हुकूम आणला आहे. तसे आदेश काढले गेले आहेत. बेळगाव हे हिंदुस्थानात आहे. महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यात सीमावाद असला तरी, मी खासदार आहे. राज्यसभेचा सदस्य आहे. या देशाचा नागरिक आहे. मला जर बेळगावमध्ये येण्यापासून रोखायचे असेल तर कायद्याने रोखावे. जबरस्तीने रोखायचा प्रयत्न करू नये.