मुंबई: पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दीड महिन्यानंतर शिवसेनेत येण्याची इच्छा आहे. त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला माझा एफआयआर नोंदवू नका असे आदेश दिले. याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच राज्यपालांकडे आणि गरज भासल्यास उच्च न्यायालयातही जाऊ असे भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी म्हणले आहे. वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला, अशी मागणीही त्यांनी काल केली होती.
Somaiya On Sanjay Pandey : पोलीस आयुक्त संजय पांडेंना शिवसेनेत जायचे आहे - सोमैय्या - wants to join Shiv Sena
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांना येत्या दीड महिन्यानंतर शिवसेनेत जाण्याची इच्छा (wants to join Shiv Sena ) आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमैय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. माझा एफआयआर ( FIR ) नोंदवू नका असा आदेश त्यांनीच दिला होता. आम्ही या संदर्भात दाद मागणार असल्याचेही सोमैय्या यांनी म्हणले आहे.
किरीट सोमैय्या
किरीट सोमैया काल खार पोलीस ठाणे येथे गेले होते. नंतर त्यांनी त्यांच्या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीविषयी चर्चा केली. हा एफआयआर पूर्णतः बनावट असून ज्यांनी हा एफआयआर बनवला त्यांच्यावर, तसेच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आज बुधवारी ते राज्यपालांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा : Phone Taping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल