मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील आयपीएस अधिकारी तिवारी यांना रविवारी मध्यरात्री क्वारंटाइन करण्यात आले. त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. आता त्यामध्ये काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. तिवार यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने ते याप्रकरणाची चौकशी करू शकणार नाही. यामुळे मुंबई पोलिसांवरील शंका अधिक वाढेल, असे निरुपम म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच आता महापालिकेच्या कामामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी निरुपम यांनी केली आहे.
सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशी प्रकरणात संजय निरुपम यांचीही उडी; म्हणाले... - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास
तिवारी यांना तत्काळ क्वारंटाइनमधून मोकळे करून त्यांना सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीसाठी मदत करावी, अन्यथा यासाठी मुंबई पोलिसांवरील शंका वाढेल, अशी भीती निरुपम यांनी व्यक्त केली आहे.
निरुपम यांनी यासाठी एक ट्विट करून तिवारी यांना क्वारंटाइन केल्याने या प्रकरणाची चौकशी कशी होईल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे तिवारी यांची बाजू घेत मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिका वेडेपणा करत असल्याची टीका केली आहे. तिवारी यांना तत्काळ क्वारंटाइनमधून मोकळे करून त्यांना सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीसाठी मदत करावी अन्यथा यासाठी मुंबई पोलिसांवर शंका वाढेल, अशी भीती निरुपम यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी मध्यरात्री तिवारी परराज्यातून विमान प्रवास करून आल्याने महापालिका प्रशासनाने त्यांना नियमाप्रमाणे क्वारंटाइन केले आहे. मात्र, यावरून बरेच राजकारण सुरू झाले आहे. त्यातच निरुपम यांनी उडी घेतल्यामुळे यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतील? हे पाहावे लागणार आहे.