मुंबई- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडली. त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडला. या दोन्ही प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. याच प्रकरणावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे. निरुपम यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
'एनआयएने संजय राऊतांची चौकशी करून वाझे प्रकरणातील मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहोचावे' - sanjay nirupam criticized shivsena
संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे. निरुपम यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
संजय निरुपम
हेही वाचा -सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त