मुंबई - एकीकडे मध्यप्रदेशात सत्ता बदलाचे वारे वाहत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेसमध्येही सगळे काही ठिक असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात वक्तव्य केले आहे. राज्यातील आघाडी सरकारही अधिक काळ टिकणार नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
महाआघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, संजय निरुपमांचा काँग्रेसला घरचा आहेर - महाराष्ट्रातील आघाडी सरकार अधिक काळ टिकणार नाही,
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात वक्तव्य केले आहे. राज्यातील आघाडी सरकारही अधिक काळ टिकणार नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदार फोडून काँग्रेसला जोरदार धक्का दिला. तिथले काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळण्याच्या स्तिथीत आहे. यावर निरुपम यांनी परखड प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हालचालींवर दिल्लीतल्या जेष्ठ काँग्रेस नेत्यांचे लक्ष होते. या नेत्यांनी वेळीच त्यांना का आवर घातला नाही? असा सवाल निरुपम यांनी केला. यावेळी निरुपम यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनाही लक्ष केले. आता राहुल गांधी यांनी पुढे येऊन पक्षावर पकड मजबूत करावी, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात कोणत्याही आधाराशिवाय तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांचे सरकार आहे. अनेक बाबींवर या सरकारचे एकमत होत नाही. त्यामुळे हे सरकार ठिकणे अवघड आहे, असे निरुपम म्हणाले. सध्या पक्षात काही वरिष्ठ नेत्यांचा दबदबा आहे. पण तरुणांनाही नेतृत्वाची संधी देण्याची आता वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून निरुपम यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर निरुपम यांनी अनेकदा काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात भूमिका व्यक्त केली असून, अद्यापही त्यांच्यावर पक्ष शिस्तीचा भंग केल्याची कारवाई करण्यात आली नाही.