मुंबई- निवडुंगाची बाग, हा काय प्रकार आहे? अनेकांनी तर निवडुंगाचे झाड पाहिलेही नसेल. मात्र, आता मुंबईकरांना निवडुंग पाहण्यासाठी वाळवंटात जाण्याची गरज नाही. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निवडुंगाची बाग पाहायला मिळणार आहे. या उद्यानात सुमारे २० ते २५ निवडुंगाच्या प्रजातींची लागवड उद्यानात करण्यात आली आहे. आणखी ४० ते ५० प्रजाती येथे लवकरच लावल्या जाणार आहेत.
मुंबईकरांना निवडुंग पाहण्यासाठी वाळवंटात जायची गरज नाही; बोरिवलीत बनतेय निवडुंगाची बाग - cactus
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निवडुंगाची बाग पाहायला मिळणार आहे. या उद्यानात सुमारे २० ते २५ निवडुंगाच्या प्रजातींची लागवड उद्यानात करण्यात आली आहे. आणखी ४० ते ५० प्रजाती येथे लवकरच लावल्या जाणार आहेत.
जगभरात निवडुंगाच्या अंदाजे ६ हजार प्रजाती आढळतात. क्रिस्टीटा, ओल्डमॅनअस्ट्रो फायटम अर्नाटम, मॅमेलीरिया, जिग्नोकॅल्शियम, इचीनो कॅक्टस ग्रुसोनील, आदी काही प्रजातींची नावे आहेत. काही प्रजातींच्या तर २५० उपप्रजाती आहेत. निवडुंगाची झाडे दिसायलाही आकर्षक दिसतात. अमेरिकेमध्ये तर ओल्डमॅन प्रजातीच्या बाजूला उभे राहून छायाचित्रे काढली जातात.
वनस्पतीशास्त्रज्ञ, जीवशास्त्र विषयाचे विद्यार्थी यांना या उद्यानाचा अभ्यासासाठी फायदा होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी, अभ्यासक उद्यानाला भेट देतील. अनेक प्रजाती भुवनेश्वरसह, उत्तर अमेरिका, मॅक्सिको, थायलंड येथून आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही निवडुंग बाग आकर्षण ठरणार आहे. लोकांना लवकरच विविध प्रजाती पाहायला मिळणार आहे, असे निवडुंग तज्ज्ञ किशोर राऊत यांनी सांगितले. अपोयिशा या निवडूंग प्रजातीमुळे कर्करोग बरा होतो, असा दावा केला जातो.